लॉकडाऊनचा सदुपयोग, KDMC प्रशासनाने अख्खे रस्तेच केले सॅनिटाइझ; पाहा PHOTO
राज्यात सर्वत्र वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळं सर्व दुकानं, मार्केट बंद असल्यानं कल्याण डोंबिनली महापालिकेनं या संधीचा फायदा घेत महानगरपालिका परिसरात सोडियम हायपोक्लोराइडच्या फवारणीची मोहीम राबवली.

2/ 6
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्यानुसारच शनिवारी ही मोहीम राबवण्यात आली.
3/ 6
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी शनिवारी ही मोहीम राबवली. तसेच काही भागांत रविवारी ही मोहीम राबवली जाणार आहे.
4/ 6
महानगरपालिका परिसरात सकाळी 7 वाजेपासून ही मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. रात्री 10 वाजेपर्यंत ही फवारणी होईल. तसेच रविवारीही सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत फवारणी होईल.
5/ 6
या मोहीमेसाठी अकरा सिटी गार्ड वाहने, 7 फायर फायटर वाहने तसेच प्रत्येक प्रभागनिहाय हॅन्ड फॉग मशीनचा वापर करण्यात येत आहे.
6/ 6
दरम्यान, डोंबिवलीमध्ये असलेल्या मानपाडा रोडवर कायम लोकांची, वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि वर्दळ दिसून येत असते. पण वीकेंड लॉकडाऊनच्या निमित्ताने शनिवारी पुन्हा एकदा हा परिसर सामसूम झाला होता.