PHOTOS : राज्यपालांच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? कंगनाने दिलं उत्तर
कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही थांबला नसून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.
|
1/ 10
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.
2/ 10
महाराष्ट्र सरकारसोबत कंगनाचा सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
3/ 10
'माझ्यावर जो अन्याय झाला, त्यासंदर्भात मी राज्यपालांची भेट घेतली. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. मी कोणी राजकारणी नाही, माझं म्हणणं राज्यपालांनी एका मुलीप्रमाणे ऐकून घेतलं,' अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर कंगनाने दिली आहे.
4/ 10
कंगनाच्या अनधिकृत ऑफिसवर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला पहिला धक्का दिला होता.
5/ 10
त्यानंतर कंगनाच्या घरामध्ये असलेल्या 8 अनधिकृत बांधकामाविषयी बीएमसीने तिला नोटीस पाठवली आहे.
6/ 10
बीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.
7/ 10
अवैध बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाला एका महिन्याची मुदत दिली आहे.
8/ 10
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने आपलं म्हणणं राज्यपालांसमोर मांडल्याची चर्चा आहे.
9/ 10
दरम्यान, कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही थांबला नसून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.
10/ 10
त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण कोणत्या वळणावर जाऊन पोहोचतं, हे पाहावं लागणार आहे.