मुंबई गेल्या काही दिवसांत इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत असताना अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या डोंगरी भागात 7 मजली इमारतीचा भाग कोसळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 3 ते 7 व्या मजल्याच्या मागील संपूर्ण भाग कोसळला असल्याचं सांगण्यात येत आहे. घटना घडताच तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. यानुसार बचाव कार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भीषण अपघातामध्ये इमारतीच्या जिन्याजवळ एक महिला अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.