मुंबईत अनेक ठिकाणी वृक्ष भुईसपाट झाली आहेत. यात अनेक गाड्यांचं मोठ नुकसान झालं आहे. मुंबईतील परेल येथील KEM हॉस्पिटलजवळ सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भले मोठे झाड बस स्टॉपवर कोसळले आहे. यात दोन बसचं मोठं नुकसान झालं आहे. मंत्रालय गार्डन गेट येथे झाड कोसळली, गाड्याचे नुकसान मुंबईत मुसळधार पावसानं कहर केला आहे. दादर चर्चगेट परिसराला तळ्याचं स्वरूप आलं आहे. पुढील 72 तास मुसळधार पावसाचे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. CSMT ते कुर्ला रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने वाशीकडे आणि कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूकही बंद आहे. दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई हायकोर्टाबाहेरही झाडं पडली. मंत्रालय गार्डन गेट येथे झाड कोसळली, गाड्याचे नुकसान मुंबईत अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहेत. वृक्ष भुईसपाट झाली आहेत. यात अनेक गाड्यांचं मोठ नुकसान झालं आहे. चर्चगेट परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं. याशिवाय दादर टीटी परिसरात नेहमीप्रमाणे पाणी साठलं आहे. हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे.