मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मुंबई » Green Mumbai Drive 2021: आज मुंबईच्या रस्त्यावर दिमाखात फिरणार या इलेक्ट्रिक कार्स, TATA च्या दोन गाड्यांचा समावेश
Green Mumbai Drive 2021: आज मुंबईच्या रस्त्यावर दिमाखात फिरणार या इलेक्ट्रिक कार्स, TATA च्या दोन गाड्यांचा समावेश
Green Mumbai Drive 2021: भारतातील इलेक्ट्रिक कारची पहिली कार रॅली आज मुंबईत होत आहे. वेगवेगळ्या ब्रँडच्या 30 इलेक्ट्रिक कार या रॅली मध्ये सहभागी आहेत. (सर्व फोटो सौजन्य- स्वाती लोखंडेे, प्रतिनिधी)
स्वाती लोखंडे, मुंबई, 02 ऑक्टोबर: सध्याच्या महागाईच्या काळात सामान्य माणूस छोट्या-छोट्या गोष्टींमधून बचत करण्याचा प्रयत्न करतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) वाढत्या किंमतीमुळे भारतात हरित ऊर्जा आणि पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.
2/ 28
इलेक्ट्रिक कार्सची क्रेझही सामान्यांमध्ये वाढली आहे
3/ 28
दरम्यान भारतातील इलेक्ट्रिक कारची पहिली कार रॅली आज मुंबईत होत आहे.
4/ 28
वेगवेगळ्या ब्रँडच्या 30 इलेक्ट्रिक कार या रॅली मध्ये सहभागी आहेत.
5/ 28
ग्रीन मुंबई ड्राइव्ह 2021 असं या रॅलीला नाव देण्यात आलं आहे
6/ 28
या इलेक्ट्रिक कार रॅलीच आयोजन ऑटोकार आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मार्फत होत आहे
7/ 28
ऑटोमोबाईलचं भविष्य हे इलेक्ट्रिक कार असल्याने पर्यावरणपूरक अशा या कार पहिल्यांदा एकत्रित येऊन कार रॅली होत आहे.
8/ 28
मुंबईच्या या रॅलीत सहभागी होणाऱ्या गाड्यांचे फोटो समोर आले आहेत
9/ 28
या कार रॅली मध्ये प्रत्येक ब्रँडच्या 1 - 1 कार आहेत
10/ 28
यामध्ये टाटाच्या 2 इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे
11/ 28
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या इलेक्ट्रिक कारच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला
12/ 28
महालक्ष्मी रेस कोर्स ते संजय गांधी नॅशनल पार्क, आरे कॉलनी आणि मग विक्रोळी mangrove पार्क असा या रॅलीचा मार्ग असणार आहे..
13/ 28
महालक्ष्मी रेस कोर्स ते संजय गांधी नॅशनल पार्क, आरे कॉलनी आणि मग विक्रोळी mangrove पार्क असा या रॅलीचा मार्ग असणार आहे..
14/ 28
यावेळी आदित्य ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली की, महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक पॉलिसी 2021 आल्यानंतर इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये वाढ होत आहे.
15/ 28
या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सुद्धा आपण इकोसिस्टीम बनवायचा प्रयत्न करतोय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले
16/ 28
याकरता चार्जिंग पॉईंट पुढील सहा महिन्यात वाढवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली
17/ 28
आदित्य ठाकरे म्हणाले की, चार्जिंग स्टेशनची आता कमतरता जाणवत आहे, याचा अर्थ आहे की इलेक्ट्रिक गाड्यांची डिमांड वाढत आहे.. हायड्रोजन फ्युअलवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा काही वर्षात दिसतील
18/ 28
सध्या बीएसटी मध्ये सुद्धा 386 बसेस इलेक्ट्रिक वर चालणारे आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंनी असा विश्वास व्यक्त केलाय की, 2023 पर्यंत नव्या 2100 इलेक्ट्रिक बस मुंबईत येत आहेत पुणे ,संभाजी नगर ,नाशिक, नवी मुंबई इथे सुद्धा अशा प्रकारच्या बसेस आपण आणणार आहोत
19/ 28
इलेक्ट्रिक गाड्याबद्दल बद्दल जनजागृती इतर शहरांमध्ये सुद्धा होणे गरजेचे आहे- आदित्य ठाकरे
20/ 28
इतर शहरांमधून सुद्धा इलेक्ट्रिक व्हेइकल ला चांगला प्रतिसाद येत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले..
21/ 28
विविध इलेक्ट्रिक कार मालकांनी या रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आहे.
22/ 28
जरी इलेक्ट्रिक कारचा वापर करण्यात यावा असे आवाहन केले जात असले तरी याकरता चार्जिंग स्टेशनची आवश्यकता निर्माण झाली आहे. सरकार त्या दृष्टीने पावलं उचलत आहे
23/ 28
पहिल्यांदाच अशाप्रकारच्या इलेक्ट्रिक कार्सच्या रॅलीचं आयोजन मुंबईत झालं आहे
24/ 28
अशाप्रकारच्या रॅलीमुळे कारप्रेमींसाठी ही पर्वणीच आहे
25/ 28
इलेक्ट्रिक कार रॅलीदरम्यान काही चिमुकल्यांचेही फोटो समोर आले आहेत. या अनोख्या अनुभवाचा हा चिमुरडा देखील आनंद घेत आहे
26/ 28
Green Mumbai Drive 2021
27/ 28
Green Mumbai Drive 2021
28/ 28
Green Mumbai Drive 2021: इलेक्ट्रिक कारची मागणी लक्षात घेता ऑटोमोबाइलचे हे भविष्य असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे