घाटकोपरमध्ये राहणारे राजेश्वर उदानी हे हिरे आणि सोने- चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी होते. ५७ वर्षीय उदानी हे २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. अंधेरीला जातो असं सांगून ते घरातून निघाले. पण त्यादिवसापासून ते घरी परतलेच नव्हते. शेवटी या प्रकरणी उदानी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.