प्रमोद पाटील प्रतिनिधी नवी मुंबई : आंबा कुणाला आवड नाही असं नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आंबा म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं. हा आंबा खाण्यासाठी अगदी मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागते. मात्र आता ती प्रतीक्षा संपली आहे. कारण आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल झाली आहे.