Cyclone Tauktae: रस्त्यांवर पाणी, विमानतळ बंद, झाडं पडली, सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबई बेहाल, पाहा PHOTO
Cyclone Taukae: चक्रीवादळाने आता अतितीव्र स्वरूप धारण केलं आहे. मुंबई, ठाणे, रायगडला त्याचा जोरदार तडाखा बसला. सोमवारी उशीरा ते गुजरात किनारपट्टीकडे जाईल.
मुंबईजवळच्या समुद्रकिनाऱ्यांवरचं हे दृश्य. मुंबईत आज IMD ने Cyclone tauktae मुळे Red Alert जारी केला आहे.
2/ 17
मुंबई आणि परिसरात सोमवारी दुपारपासून तुफान वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला.
3/ 17
वाऱ्याचा वेग काही ठिकाणी ताशी 120 किमी पर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि रस्ते बंद झाले.
4/ 17
सकाळपासूनच मुंबईत असा अंधार होता. वादळाचा परिणाम मंगळवारपर्यंत जाणवण्याचा अंदाज आहे.
5/ 17
Cyclone Tauktae सोमवारी रात्री गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने जाईल. रात्री उशीरा गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
6/ 17
National Disaster Response Force (NDRF) च्या तीन टीम मुंबई उपनगरात तैनात आहेत. नौदलालाही अलर्ट राहायला सांगितलं आहे.
7/ 17
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने समुद्रकिनाऱ्यावरचं सगळं काम बंद होतं.
8/ 17
देवगड बंदराजवळ पाच खलाशी बेपत्ता झाल्याची बातमी आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
9/ 17
भारतीय हवाई दलाने C-130J and a An-32 अशी दोन विमानं NDRF टीमसाठी ठेवली आहेत. मुंबई आणि अहमदाबादकडे यातून जवानांना नेलं जाईल.
10/ 17
मुंबई: बांद्रा, कार्टर रोड इथे झाडं पडल्याने झालेली अवस्था
11/ 17
महाराष्ट्रात पोहोचण्याआधी तौक्ते चक्रीवादळाने दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. कन्याकुमारीचा उधाणलेला समुद्र. केरळ, कर्नाटक किनारपट्टीचे काही फोटो पुढे पाहा..
12/ 17
कोस्टल कर्नाटक
13/ 17
कर्नाटकात दक्षिण कन्नडा, उडुपी, उत्तर कन्नडा, शिवमोगा, चिकमंगळूर, हासन या जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला.
14/ 17
NDRF आणि कोस्ट गार्डच्या टीम तैनात
15/ 17
कर्नाटकातला धुमाकूळ
16/ 17
उत्तर कन्नडा, बेळगाव, उडुपी जिव्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं.
17/ 17
तौत्के चक्रीवादळ सोमवारी उशीरा गुजरातला धडकणार आहे.