COVID-19: डायबेटिसच्या रुग्णांना जास्त काळजीची गरज, आढळून आलीत 2 नवी लक्षणे
ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे आढळली आणि त्यांना डायबेटिस असेल तर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही जास्त काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
|
1/ 7
मुंबई - कोरोनावर रामबाण औषध निघालेलं नसलं तरी आता अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. कोरोनाची लक्षणे आणि इतर गोष्टींची बरीच माहिती आता बाहेर आली आहे.
2/ 7
जगभरातल्या रुग्णांचा अभ्यास करून त्याविषयी डॉक्टर्स माहिती देत आहेत. तर राज्यात सरकारने स्थापन केलेला टास्क फोर्स त्याचा अभ्यास करत आहे.
3/ 7
ज्या लोकांना डायबेटिस, ब्लडप्रेशर किंवा इतर काही आजार असले तर त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डायबेटिस असणाऱ्या रुग्णांमध्ये काही नवी लक्षणे आढळून आली आहेत.
4/ 7
ज्यांना डायबेटिस आहे अशा लोकांना जर लागण झाली तर त्यांना सुरुवातीला हलकी लक्षणे दिसून येतात.
5/ 7
मात्र अशा रुग्णांमध्ये अचानक साखर एकदम कमी किंवा एकदम जास्त होत असल्याचं डॉक्टरांना आढळून आलं आहे.
6/ 7
असा चढ उतार झाला आणि उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाच्या जीवाला धोकाही होऊ शकतो.
7/ 7
त्यामुळे ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे आढळली आणि त्यांना डायबेटिस असेल तर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही जास्त काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.