वेगळंच वाटतंय शहर! 26/11 किंवा 26 जुलैनंतरही मुंबईच्या लाइफ लाइनचं असं चित्र पाहिलं नसेल
मुंबईवर झालेला हल्ला असो किंवा निसर्गाची अवकृपा होऊन आलेला 26 जुलैचा पूर असो... त्यानंतरही मुंबई एवढी शांत आणि निर्मनुष्य कधी झालेली दिसली नव्हती. हे फोटो पाहून खरं वाटेल का ही मुंबईची लाइफ लाइन आहे?
|
1/ 13
मुंबईची लाइफ लाइन कधी थांबत नाही, असं म्हणतात. एवढा शुकशुकाट मुंबईतल्या कुठल्या स्टेशनवर पूर्वी कधी पाहिल्याचं आठवतंय?
2/ 13
राज्यातल्या सगळ्याच रेल्वे गाड्या आता सामान्य प्रवाशांसाठी बंद आहेत. मुंबईतसुद्धा उपनगरीय रेल्वेची वाहतूक बंद आहे. त्यामुळे गर्दीने ओसंडून वाहणारी लाइफ लाइन रिकामी आहे.
3/ 13
26/11 च्या मुंबईवरच्या हल्ल्यानंतर किंवा 26 जुलैच्या महापूरानंतरही महानगरी मुंबई एवढी शांत कधी दिसली नव्हती.
4/ 13
सर्वच उपनगरी रेल्वेच्या स्टेशन्सवर असा शुकशुकाट दिसतो आहे.
5/ 13
6/ 13
7/ 13
लोकलच नाही, तर रस्तेसुद्धा ओस पडले आहेत.
8/ 13
मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी गेट वे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताजमहालचा परिसर लक्ष्य करण्यात आला होता. पण त्याहीवेळी दिसली नसेल तशी स्मशानशांतता तिथे आता आहे.
9/ 13
मुंबईची चौपाटी इतकी निर्मनुष्य... गिरगाव आणि जुहू दोन्ही चौपाट्यांवर लाटांच्या आवाजाखेरीज निरव शांतता होती.
10/ 13
मंत्रालयातही अत्यंत आवश्यक कामासाठीच अधिकारी आले होते. बाकीच्यांनी घरूनच काम सुरू केलं आहे. त्यामुळे हा परिसरही मोकळा होता.
11/ 13
जगप्रसिद्ध एशियाटिक लायब्ररीचा हा परिसर एवढा शांत कधीच नसतो.
12/ 13
मुंबईचा मरीन ड्राइव्ह आहे हा, हे सांगावं लागावं... एवढे निर्मनुष्य रस्ते नरिमन पॉइंट भागात दिसले.