Lockdown मुंबईच्या उंबरठ्यावर; या शहरात Night curfew
महाराष्ट्रात आता पुन्हा Lockdown सारखी परिस्थिती उद्भवली आहे. स्थानिक प्रशासनाने तर कठोर पावलंही उचलली आहेत. काही शहरात Night curfew लागू करण्यात आला आहे.
|
1/ 7
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, पुन्हा लॉकडाऊन लागू होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
2/ 7
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील राज्यात लॉकडाऊनबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत. पण आता हा लॉकडाऊन मुंबईच्या उंबरठ्यावर आला आहे. पनवेलमध्ये रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे.
3/ 7
लग्न समारंभासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक. फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे होतील.
4/ 7
सार्वजनिक-गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरताना आढळल्यास 500 रुपये दंड
5/ 7
या कालावधीत दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता महाविद्यालयीन वर्ग आणि खासगी क्लासेसही पूर्णपणे बंद राहतील. पाचवी ते नववीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीनेच सुरू राहतील.
6/ 7
खेळाचे सामने आणि स्पर्धा होणार नाहीत. अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के उपस्थितीसह कोरोना नियमांचं पालन करून सुरू राहतील.
7/ 7
नियमांचं पालन न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं आहे.