मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मुंबई » कृत्रिम लायटिंगने नव्हे निसर्गानेच रंग भरले मुंबईच्या ऐतिहासिक इमारतीवर; इंद्रधनुष्याच्या कमानीत CST चं विहंगम दृश्य पाहा PHOTO
कृत्रिम लायटिंगने नव्हे निसर्गानेच रंग भरले मुंबईच्या ऐतिहासिक इमारतीवर; इंद्रधनुष्याच्या कमानीत CST चं विहंगम दृश्य पाहा PHOTO
आकाशात मावळतीच्या रंगांची उधळण झाली आणि मुंबईत ढगाळ वातावरणामुळे असं विहंगम चित्र उभं राहिलं. Mumbai CST चे PHOTOS
मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर जरी कमी असला तरी ढगाळ वातावरण अजूनही कायम आहे. त्यामुळे आता गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यताही वर्तवली जात होती.
2/ 5
Mumbai CST स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीजवळ आज इंद्रधनुष्य दिसलं. संध्याकाळी एकीकडे आकाशात मावळतीच्या रंगांची उधळण होती तर दुसरीकडे इंद्रधनुष्याची त्यामुळे असं विहंगम दृश्य दिसत होतं.
3/ 5
मुंबईत पाऊस काही आला नाही. परंतु ढगाळ आणि रंगीबेरंगी वातावरणामुळे वातावरणात ओलावा निर्माण झाला होता. CST हे रेल्वेस्टेशन हे मुंबईतील मोठ्या गर्दीचं ठिकाण मानलं जातं.
4/ 5
CST मुंबईचं मुख्य रेल्वे स्टेशन आणि तसंच प्रेक्षणीय स्थळही आहे. त्यात अशी नैसर्गिक रंगांच्या उधळणीमुळे अनेकांना मोबाइलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य साठवून ठेवायचा मोह आवरला नाही.
5/ 5
CST वर रंगाची चादर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलासुद्धा या स्टेशनला सजवलं जातं. पण ते इलेक्ट्रिक लायटिंगने. निसर्गानेच इथे लायटिंग केलं आणि त्यामुळे या वास्तूचं सौंदर्य दुणावलं.