गावी जाण्यासाठी घर सोडलं आता कुठे जाऊ? मुंबईतल्या स्थलांतरित मजुरांचे हाल पाहून डोळ्यात येईल पाणी
स्थलांतरित मजुरांनी मुंबईतून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडायला एकच गर्दी केली. पण त्यांची गावासाठीची प्रतीक्षा आणि हाल अजून संपलेले नाहीत, हेच हे PHOTO सांगतील.
|
1/ 13
मुंबईत पुन्हा एकदा आज गावी जाण्याची इच्छा असलेल्या स्थलांतरितांची अगतिक गर्दी दिसली.
2/ 13
सरकारने सांगितलेले सगळे सोपस्कार केले आणि ट्रेन मिळेल या आशेने रेल्वे स्टेशन गाठलं, पण गाडीत जागा मिळाली नाही.
3/ 13
2 महिन्यांपासून गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी रेल्वेने पाठविण्यात येईल असं सांगून सकाळपासून विक्रोळी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं होतं.
4/ 13
गावी जायला मिळेल या आशेने तिथे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पण गाड्या रद्द झाल्याने त्यांच्या गावी जायला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
5/ 13
रेल्वेची सोय होणार हे कळताच या मंडळींनी आपलं राहतं भाड्याचं घर सोडलं. सामानाची बांधाबांध केली आणि ते पोलीस स्टेशनला पोहोचले. आता गाडी तर मिळाली नाही, पण घरही गेलं. परत जायला जागाच उरली नाही, अशी त्यांची अवस्था झाली.
6/ 13
पोलीस स्टेशनबाहेर आशेने रांगा लावलेल्या मजुरांना तुम्हाला परत जावं लागेल असं सांगतात जायचं कुठे? या भीतीने त्या लोकांच्या पोटात गोळाच आला.
7/ 13
सकाळपासून उपाशी तापाशी गर्दी करून बसलेल्या मजुरांना दुपारी 'गाडी नाहीय. घरी जा. गाडी असेल तेव्हा फोन करून कळवण्यात येईल', असं कळवण्यात आलं.
8/ 13
गाडीची व्यवस्था झालेली नव्हती तर पोलिसांनी या बिचाऱ्या मजुरांना बोलावलाच का? असे प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते रमेश मोहिते आणि सिद्धार्थ मोकळे यांनी विचारले आहेत.
9/ 13
गावी जाण्यासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करायला लागेल, गाव पाहता येईल का, तोपर्यंत आम्ही कुठे जायचं, कुठे राहायचं या प्रश्नांची उत्तर कुणाकडेच नाहीत.
10/ 13
अनेक कामगार संतापून आता पायी चालत गावी जाणार असे म्हणून निघून गेले.
11/ 13
लांतरित कामगारांचा प्रश्न अद्यापही संपलेला नाही. रेल्वेसेवा सुरू झाली तरी फक्त श्रमिक स्पेशल ट्रेन धावत आहेत.
12/ 13
या श्रमिक ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं याविषयी या मजुरांमध्ये अनभिज्ञता आहे. त्यामुळे गोंधळ वाढतो आहे.
13/ 13
लेकराबाळांसह घर सोडून निघालेल्या या मजुरांनी आता गावाच्या प्रतीक्षेत कुठे जायचं याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. (FILE PHOTO)