सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले मुंबई पोलीस कोरोनापासूनही जनतेला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला दंड, दंडुक्याचा मार यापासून ते अगदी बेडुक उड्या, कोंबडा बनवणं अशा विचित्र शिक्षा करतानाही पाहिलं. पण आता सोशल मीडियावर मुंबई पोलिसांनी बॉलिवूड आणि फिल्मी स्टाइलमध्ये कोरोनापासून बचावाचा उपाय सांगितला आहे.