

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी ठाकरे कुटुंबीयांमध्ये त्यांच्या संपत्तीसंदर्भात वाद सुरू झाल्याची कुणकुण लागली आणि बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी उद्धव यांच्या विरोधात थेट न्यायालयातच दावा ठोकला.


बाळासाहेब ठाकरेंना ३ मुलं. त्यातला मोठा मुलगा बिंदुमाधव यांचं लवकर निधन झालं. जयदेव ठाकरे आणि धाकटा मुलगा उद्धव ठाकरे.


जयदेव ठाकरे यांची पत्नी स्मिता ठाकरे या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत आणि प्रसिद्ध निर्मात्या आहेत. पण जयदेव आणि स्मिता यांचा घटस्फोट झालेला आहे.


उद्धव यांनी बाळासाहेबांच्या आजारपणात मृत्युपत्रात फेरफार करून घेतले, असा जयदेव यांचा आरोप होता. त्यासंदर्भात त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.


बाळासाहेब त्यांच्या संपत्तीतला वाटा मला द्यायला तयार होते, असं खुद्द त्यांनीच मला सांगितलं होतं, असं जयदेव यांनी कोर्टात सांगितलं.


या खटल्याची सुनावणी इन कॅमेरा करण्याची विनंती करण्यात आली, कारण जयदेव यांनी काही खासगी गोष्टी उघडपणे सांगितल्या.


स्मिता ठाकरे यांचा ऐश्वर्य हा आपला मुलगा आपल्यापासून झाला नसल्याचा धक्कादायक दावा जयदेव यांनी कोर्टात केला होता.