

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा लग्न सोहळा सुरू आहे. यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत.


राज ठाकरेंच्या सुपुत्राच्या लग्नाला क्रिकेटपासून ते राजकारणातील विविध दिग्गज उपस्थित आहेत. पाहुयात या सोहळ्याला कुणी-कुणी उपस्थिती लावली आहे.


यावेळी मुलाच्या लग्नसोहळ्याला जाताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठमोळ्या पेहरावात पाहायला मिळाले.


कोण आहे ठाकरे घराण्याची सून मिताली बोरुडे? मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत.


अमित आणि मिताली या दोघांची बालपणाची मैत्री आहे. अमित ठाकरे यांनी डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. तसंच त्यांनी आर्किटेक्चरचंही शिक्षण घेतलं आहे.


तरुणाईमध्ये अमित यांची फार क्रेझ दिसून येते. वडील राज ठाकरेप्रमाणेच अमितही व्यंगचित्रकार आहेत. ते स्केचिंगही करतात. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज))


फुटबॉल स्टार रोनाल्डोला भारतात आणण्यात अमित यांची फार मोठी भूमिका आहे. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज)


2017 च्या महापालिका निवडणुकीदरम्यान अमित ठाकरे आजारी होते. मात्र आजारातून बरे झाल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले.


त्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अमित यांनी त्यांची बालमैत्रीण मितालीसोबत साखरपुडा केला.