मुंबई, 19 ऑगस्ट : देशात होणारी तस्करी रोखण्यासाठी एनसीबीने कंबर कसली आहे. मुंबई विमानतळावरुन तस्करीच्या नवनव्या कल्पनांचा अवलंब करून गुन्हेगारी केली जात आहे. नुकतीच एनसीबीने मुंबई विमानतळावरुन तीन महिलांना अटक केली आहे. या महिलांनी ज्या पद्धतीचा वापर केला होता त्यानंतर अधिकारीही हैराण झाले.