

या आठवड्यात तुम्ही बँकेच्या फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये जास्त व्याज मिळवू शकाल. इंडियाबुल्स कंझ्युमर फाइनॅन्स (Indiabulls Consumer Finance)ची एनसीडी गुंतवणूक खुली झालीय. या इश्यूमधून कंपनी 250 कोटी रुपये मिळवणार आहे. NCD व्याज दर 10.75 ते 11 टक्के आहे. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर बचत खात्यातून तुम्हाला तिप्पट व्याज मिळेल. इंडियाबुल्स कंझ्युमर फायनान्सचा एनसीडी 4 मार्चपर्यंत खुला असणार. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर ग्राहकांना फायदा मिळेल.


NCD काय आहे? तुम्हाला रेग्युलर इनकम हवा असेल तर हा पर्याय उत्तम आहे. NCD कंपनीनं घोषित केलेले बाँड आहेत. यावर व्याज दर ठरतात. कंवर्टिबल डिबेंचरच्या तुलनेत ते जास्त असतात. हे सिक्युर्ड किंवा अनसिक्युर्ड असतं. सिक्युर्ड म्हणजे गॅरंटीची गरज असते, अनसिक्युर्डला ती नसते.


सिक्युर्ड रिमिडेबल नॉन कंवर्टबिल डिबेंचर इश्यू आहे. 4 फेब्रुवारीला तो ओपन झाला. 4 मार्चला तो बंद होईल. पण कंपनीची गरज पूर्ण झाली तर तो आधीही बंद होऊ शकतो.


इंडियाबुल्स कंझ्युमर फायनॅन्स एनसीडीमधून 250 कोटींची गुंतवणूक करू इच्छितेय. कंपनीला 2750 कोटी रुपयेही मिळू शकतात. इथे 26 महिने, 38 आणि 60 महिन्यांसाठी गुंतवणूक करता येते.