जगातला सर्वात महागडा हिरा 'लेसदी ला रोना' विक्रीला काढतायत. पण त्याच्या किमतीचा अंदाज कोणालाच येत नाहीय. जगातला सर्वात मोठा स्क्वायर कट डायमंड 'ग्रास लेसदी ला रोना' GIAद्वारा प्रमाणित आहे. सर्वात रंगीत आणि जास्त पारदर्शी असा हा हिरा आहे. हा हिरा विकणारी ब्रिटनची कंपनी ग्राफनं अजून हिऱ्याची किंमत सांगितली नाहीय.हा स्क्वायर डायमंड 302.37 कॅरेटचा आहे. 2015मध्ये आफ्रिकेतल्या बोस्तवाना खाणीतून हा हिरा मिळाला. तेव्हा त्याचं वजन होतं 1109 कॅरेट. जगातला हा दुसरा सर्वात मोठा असलेला रफ हिरा होता. ब्रिटनच्या ग्राफ कंपनीनं 2017मध्ये तो 5.3 कोटी डाॅलर्स देऊन खरेदी केला. या हिऱ्यावर 18 महिने काम केलं गेलं. एवढ्या मोठ्या हिऱ्याला पैलू पाडणं कठीण काम. हे काम खूप सावधतेनं करावं लागतं. कारण चूक झाली तर खूप महाग पडू शकतं.