युरिया आणि नॅनो युरियासंदर्भात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केंद्र सरकारने काही खास पावलं उचलली आहेत.
2/ 6
खतांचे अनुदान कमी व्हावे आणि खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे.
3/ 6
सरकारने खत कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. सरकारने खत कंपन्यांच्या सीईओंना पत्र लिहिले आहे.
4/ 6
नॅनो युरियाची विक्री वाढवण्यासाठी कंपन्यांनी पावले उचलावीत, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारवरील सब्सिडीचा भार कमी होईल.
5/ 6
नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची बचत होणार आहे. प्रत्येक गोणीमागे 41 रुपये वाचू शकतील. नॅनो युरिया अर्धी बाटली घ्यायचं असेल तर साधारण 225 रुपये मोजावे लागू शकतात.
6/ 6
नॅनो युरियावर अनुदान नाही. युरियाच्या अनुदानित पिशव्यांची किंमत २६६ रुपये असताना कंपन्यांनी नॅनो युरियाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.