बाॅलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी मर्सिडीज बेंज वी क्लास (Mercedes-Benz V Class) MPV खरेदी केलीय. त्याची किंमत आहे 81.90 लाख रुपये. अमिताभ बच्चन पहिले भारतीय सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे सेडान, एसयुव्हीनंतर MPV ही लक्झरी कार आहे. जाणून घेऊ या या कारची खासीयत
2/ 5
या कारमध्ये 2.1-लीटर डिझल इंजिन आहे जे 163PS ची पाॅवर आणि 380Nm पीक टॉर्क जनरेट करतं. याचं इंजिन बीएस6 एमिशन नॉर्म्ससारखं आहे.
3/ 5
ही कार 10.9 सेकंदात 0 ते 100 कि.मी. प्रति तास वेग घेते. याचा सर्वात जास्त वेग 195 किमी प्रति तास आहे.
4/ 5
यात केबिनच्या लाइटप्रमाणे कारचा अॅम्बियन्स बदलतो. यात मर्सिडीज ऑडियो 20 इंफोटेनमेंट सिस्टम आहे. त्यामुळे नेव्हिगेशन आणि मल्टिमीडिया फीचर्स मिळतात.
5/ 5
याशिवाय यात 6 एयरबॅग्स, अटेंशन असिस्ट, क्रासविंड असिस्ट, कोलिजन प्रीवेंशन असिस्ट, हेडलँप असिस्ट, टायरप्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, 360 डिग्री कॅमरा, लेन असिस्ट आणि अॅक्टिव पार्क असिस्ट याही सुविधा आहेत.