अल्फाबेट आणि गुगलचे CEO सुंदर पिचाई सध्या चर्चेत आहेत. एकेकाळी पिचाई यांना भारत ते अमेरिकेत विमानाचे तिकीट खरेदी करणे देखील कठीण होते. आज ते वार्षकि 242 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 1880 कोटी रुपये कमावतात.
गूगल कर्मचाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या टाऊन हॉल बैठकीत, पिचाई यांनी व्हाइस प्रेसिटेंड स्तरावरील सर्व कर्मचार्यांच्या पगारात मोठी कपात केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र, किती पगारात कपात होणार हे पिचाई यांनी सांगितले नाही. पण, पिचाई यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात कपात होणार हे निश्चित आहे. कपात केल्यानंतरही पिचाई यांना मोठे पॅकेज मिळत राहणार आहे.
अल्फाबेटमधील कर्मचार्यांच्या छाटणीच्या काही काळापूर्वी कंपनी बोर्डाने सुंदर पिचाई यांच्या पगारात मोठी वाढ केली होती. सीईओ म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट मानली गेली आणि 2019 मध्ये परफॉर्मन्स स्टॉक युनिट्स 43 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर त्यांच्या कामाचे कौतुक झाले. हे पेआउटसाठी आवश्यक परफॉर्मेंस वाढवते.
सुंदर पिचाई यांना मूळ वेतन म्हणून 2 मिलियन डॉलर मिळतात. पिचाई यांच्याकडे अल्फाबेटचे एकूण 88,693 अल्फाबेट शेअर्स आहेत. हे कंपनीच्या एकूण शेअर्सच्या 0.01 टक्के आहे. त्यांचे सर्व शेअर्स, गुंतवणूक आणि पगार यांचा समावेश करून, 2023 मध्ये सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती 1,310 मिलियन डॉलर किंवा 1.31 बिलियन डॉलर है.