संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान देशांतर्गत शेअर बाजार आज दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. याआधी बाजारात सपाट सुरुवात झाली होती. RIL, ICICI बँक, TCS, Infosys आणि ITC सारख्या अनेक मोठ्या निफ्टी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. यासह, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायजेशन सुमारे 2 लाख कोटी रुपयांनी घसरलेय.
आज दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी जवळपास 165 अंकांनी घसरून 17,590 बंद झाला. तर सेन्सेक्स जवळपास 542 अंकांनी घसरून 59,806 वर बंद झाला. निफ्टी बँकेतही 320 अंकांची घसरण दिसून आली, त्यानंतर तो 41,257 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप इंडेक्सही 171 अंकांच्या घसरणीसह 30,949 वर बंद झाला. Maha budget 2023 : 10 लाख घरांच्या निर्मितीचा संकल्प; जाणून घ्या कोणत्या समाजासाठी किती घरं?
ब्रोकरेजच्या पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर Tata Steel, Hindalco आणिJSW Steelचे शेअर्स बढतीवर बंद होण्यात यशस्वी ठरले. ऑर्डर मिळाल्यानंतर Olectra GreenTech मध्ये आज 20% ची जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. यासह हा शेअर आज 9 महिन्यांच्या वरच्या पातळीवर बंद झाला. Credit Score चांगलाय, तरी लोन मिळत नाही? असू शकतात ही कारणं