केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो. मोदी सरकारची (Modi Government) अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जन धन खातं (PM Jan Dhan Yojana). तुमचं देखील जन धन खातं SBI मध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती (Accidental Cover Benefit) विमा मिळेल.
योजनेसाठी कोण पात्र-जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या अपघातील विम्याचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा युजरने दुर्घटनेच्या 90 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने बँकेअंतर्गत किंवा इंटर बँक दोन्ही चॅनेलवर आर्थिक किंवा गैरआर्थिक व्यवहार केला आहे. हा व्यवहार यशस्वी असणंही आवश्यक आहे. ही अट पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा केल्यावर विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येईल.
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी कागदपत्रं असणं आवश्यक-1) इन्शुरन्स क्लेम फॉर्म 2) मृत्यूच्या प्रमाणपत्राची मूळ कॉपी 3) अपघाताचा तपशील देणारा प्राथमिक किंवा पोलिसांचा अहवाल, त्याची मूळ किंवा प्रमाणित कॉपी 4) मृत्यू इतर कोणत्याही कारणामुळे झाल्यास रासायनिक विश्लेषण किंवा एफएसएल अहवालासह पोस्ट मॉर्टम अहवालाची मूळ किंवा प्रमाणित प्रत 5) -कार्डधारक आणि नॉमिनीच्या आधार कार्डाची मूळ कॉपी