जगात मौल्यवान वस्तूंची कमतरता नाही. घर, कार, हिरे आणि दागिने यासारख्या महागड्या वस्तूंबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. परंतु तुम्ही जगातील सर्वात महागड्या द्राक्षाविषयी कधी ऐकले आहे का? भारतात हिरवी द्राक्षे 60 ते 80 रुपये किलोने विकली जातात. तर काळ्या द्राक्षांचा दर 80 ते 120 रुपये किलो आहे. याशिवाय द्राक्षांचा आणखी एक प्रकार आहे जो किलोने विकला जात नाही तर घडांमध्ये विकला जातो. काय सांगता! नदीच्या काठावरं मिळतंय सोनं, शोधण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र रुबी रोमन द्राक्षे घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. या द्राक्षांच्या एका घडाची किंमत 8 लाख 80 हजारांपेक्षा जास्त आहे. ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?
रुबी रोमन ग्रेप्स हा एक विशेष प्रकार आहे. जो इशिकावा केवळ इशिकावा, जपान या प्रांतांमध्ये पिकवला जातो. या द्राक्षाला जगातील सर्वात महाग द्राक्ष म्हटले जाते. रुबी रोमन द्राक्षांमध्ये आम्ल कमी आणि गोडपणा जास्त असतो आणि ते खूप रसदार असतात. प्रत्येक द्राक्षाचे वजन सुमारे 20 ग्रॅम असते. 'या' वेबसाइट्सवर चक्क रेंटने घेता येतो AC! ना पैशांच टेन्शन ना सर्व्हिसिंगची कटकट
महत्त्वाचं म्हणजे रुबी रोमन द्राक्षे मिळविण्यासाठी 14 वर्षे वाट पाहावी लागते. 2008 मध्ये जपानी शेतकरी सुतोमू ताकेमोरी यांनी उत्पादित केलेल्या या प्रकारच्या पहिल्या द्राक्षांचा लिलाव करण्यात आला. 14 वर्षांच्या मेहनतीनंतर द्राक्षांचा घड 910 डॉलर्स म्हणजेच 75 हजारांना विकला गेला होता. 5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची 'ही' स्किम आहे बेस्ट
रुबी रोमन द्राक्षांना द्राक्षांच्या सर्वोत्तम जातीचा दर्जा आहे. हे द्राक्ष सामान्य द्राक्षांपेक्षा 3 ते 4 पट मोठे आहे. एका द्राक्षाचे वजन सुमारे 20 ग्रॅम आहे. परंतु प्रीमियम क्वालिटी द्राक्षांचे वजनही 30 ग्रॅमपर्यंत असते. 'या' वेबसाइट्सवर चक्क रेंटने घेता येतो AC! ना पैशांच टेन्शन ना सर्व्हिसिंगची कटकट