मोदी सरकार शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) शेतीसाठी तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा पुढील हप्ता पाठवण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत पाठवण्यात येणारा सातवा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 1 डिसेंबरपासून दिला जाणार आहे. मनीकंट्रोलमधील वृत्तानुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ-या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर त्यांची जमीन असली पाहिजे. जर एखादी व्यक्ती शेती करत असेल, पण त्याच्या नावावर शेतजमीन नसेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती शेतकरी आहे पण ती सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी सेवेतून निवृत्त झाला आहे तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मासिक पेन्शन 10 हजार मिळत असेल तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजनेसाठी अशी करा तुमच्या नावाची नोंदणी- या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा आणि त्याठिकाणी असणाऱ्या Farmer Tab वर क्लिक करा. या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील तपासू शकता. Farmer Tab वर क्लिक करून याठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता. फार्मर टॅबवर new registration वर क्लिक करून नवीन अर्ज करता येईल
त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हााला आधार नंबर एंटर करावा लागेल. याशिवाय शेतकऱ्यांना नाव, जेंडर, श्रेणी, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पत्ता, मोबाइल नंबर, जन्मतिथी इत्यादी माहिती द्यावी लागेल. त्याचप्रमाणे जमीनीची आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील. सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह पर्यायावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा. या फॉर्मची एक प्रिंट तुमच्याकडे ठेवा.
अशा सुधारा रजिस्ट्रेशनमधील चुका- पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर अर्ज करताना झालेल्या चुका सुधारता येतात. वेबसाइटवरील फार्मर कॉर्नरवर जा आणि त्याठिकाणी Edit Aadhaar Details वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा योग्य आधार नंबर टाकता येईल. जर तुमचे नाव चुकीचे असेल किंवा आधारवरील नावाशी जुळत नसेल तर ही चूक देखील सुधारता येतेय. आणखी मदतीसाठी तुम्ही लेखपाल किंवा कृषी विभागाशी संपर्क करू शकता.