तुम्ही परदेशात नोकरी शोधताय? मग एक खुशखबर आहे. कॅनडामध्ये ग्लोबल टॅलंट स्ट्रीम (GTS) हा नवा प्रोग्रॅम सुरू केलाय. यात जगभरातून हुशार व्यक्तींना नोकरीवर नियुक्त केलं जाईल.
2/ 4
या योजनेअंतर्गत टेक्नाॅलाॅजी, इंजिनियरिंग आणि गणित याचा अभ्यास असणाऱ्यांना संधी मिळेल. अमेरिकेत राहणारे भारतीय याचा फायदा घेऊ शकतात.
3/ 4
कंपन्यांनी दिलेल्या आवेदनावर दोन आठवड्यात निर्णय घेतला जाईल. जीटीएस योजनेअंतर्गत कॅनडामध्ये नोकरी मिळणाऱ्या व्यक्तीला फक्त कामाचा अनुभवच मिळणार नाही तर त्याला स्थायी नागरिकत्वही मिळण्याची संधी उपलब्ध होईल.
4/ 4
कॅनडाचे IRCC मंत्री अहमद हुसेन यांनी सांगितलं, आम्हाला जगभरातले कौशल्य असलेले लोक हवे आहेत.