

तुम्ही पैशांची छोटीशी बचत करुनही बक्कळ पैसे कमवू शकता. जर तुम्ही रोजच्या खर्चातून दररोज 100-150 रुपये वाचवाल तर गुंतवणूक करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. हे शक्य आहे पोस्ट ऑफिसच्या PPF या योजनेतून.


रोज 150 रुपयांची गुंतवणूकीचा हिशोब केला तर 20 वर्षाच्या नोकरीमध्ये अतिरिक्त 25 लाख रुपयांचा फंड तुम्हाला मिळेल. त्यात पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे सुरक्षितही राहतील.


वयाच्या 25 व्या वर्षी तुम्ही जर 30-35 हजार रुपये कमवत असाल तर इतर कुठेही जास्त पैसे गुंतवण्यापेक्षा 100-150 रुपयांची गुंतवणूक सहज होऊ शकते. ही बचत वयाच्या 45 व्या वर्षी तुम्हाला अतिरिक्त 25 लाख रुपये फंड देईल. त्यात आजच्या काळात रोज 100-150 रुपयांची गुंतवणूक करणं काही अवघड नाही आहे.


पोस्ट ऑफिसने नागरिकांना पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी दिली आहे. हे खातं 15 वर्षांसाठी उघडता येईल. जे पुढील 5 वर्षांसाठी वाढवता येते. सध्या पीपीएफमध्ये 7.6 टक्के व्याजदर आहे, जो दरवर्षी वाढत जातो. पीपीएफमध्ये किमान 100 रुपयांनी खाते उघडता येतं. एका वर्षामध्ये किमान 500 रुपये गुंतवणूक करणं आवश्यक आहे, तर आपण एका वर्षात एका खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख गुंतवणूक करू शकता.


15 वर्षांमध्ये 15.30 लाख निधी उभारला जाऊ शकतो. जर आपण दररोज 150 रुपये बचत करून पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर 15 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 8.10 लाख होईल.


20 वर्षांमध्ये आपल्याला 25.44 लाख रुपये मिळतील. जर आपण दररोज बचतीसाठी 150 रुपये पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर ते दरमहा 4500 रुपये होईल. दरमहा 4500 रुपये गुंतवणूक केली तर वार्षिक 54 हजार रुपये होतील.


पीपीएफ खात्याचे फायदे: हे खाते केवळ 100 रुपयांसाठी उघडता येते. यात जॉईंट खातं उघडलं जाऊ शकते. खाते उघडताना नॉमिनेशन सुविधा उपलब्ध असते. 15 वर्षांचा मेच्योरिटी परियड पूर्ण झाल्यानंतर, खातं 5-5 वर्षांनी दुप्पट वाढवू शकता. यात उत्पन्न कर नाही आहे. खात्यावर कर्ज तिसऱ्या आर्थिक वर्षात घेतलं जाऊ शकतं.