अनिल कुमार, नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: गाड्यांची नोंदणी करताना आता वाहन चाहकांना नॉमिनी अर्थात उत्तराधिकाऱ्याचे नाव देखील द्यावे लागू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये प्रस्तावित दुरुस्तीबद्दल सामान्य लोकं आणि सर्व भागधारकांच्या सूचना तसंच टिप्पण्या मागवल्या आहेत.
नियम 55 आणि 56- मालकी हक्काचे हस्तांतरण असा अतिरिक्त क्लॉज जोडला जाईल. ज्याअंतर्गत नॉमिनीचे ओळखपत्र असल्यास ते मेन्शन केले जाईल. नियम 57- सार्वजनिक लिलावात खरेदी केलेल्या वाहनांचे हस्तांतरण - वाहनाच्या नोंदणी फॉर्ममध्ये अतिरिक्त कलम जोडले जाऊ शकते. ज्याअंतर्गत नॉमिनीच्या नावाचे तपशील देता येतील. वाहन मालकाच्या मृत्यूनंतर वाहन त्याच्याकडे हस्तांतरित करता येईल.