आपल्या आजुबाजूच्या सर्वच गोष्टी खूप वेगाने स्मार्ट होत आहेत. घरातील पंखा असो, एसी असो की दाराचे कुलूप उघडणे, आता सर्व कामे अगदी सहज कमांड देऊन केली जातात. टेक्नॉलॉजी एवढी अडव्हान्स होतेय की आता फोनवरूनही बल्ब कंट्रोल केला जाऊ शकतो. चांगली गोष्ट म्हणजे यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. येथे आम्ही NFC टॅगबद्दल बोलत आहोत, ज्याचा वापर घर आणखी स्मार्ट बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.
सर्वप्रथम हे जाणून घेऊया की हे NFC काय आहे? NFC (नियर फील्ड कम्युनिकेशन) RF सिग्नलवर काम करते. याचा वापर कमी रेंज म्हणजेच कमी अंतरासाठी करता येतो. यूझर्स ते 4 सेमी अंतरावरुन नियंत्रित करतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, यासाठी सिग्नल देण्यासाठी ट्रान्समिटिंग डिव्हाईस आणि सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी रिसीव्हिंग डिव्हाईस असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध
हा टॅग यूझर्स त्यांच्या फोनच्या मागे, स्मार्ट टीव्ही, AC, बल्ब आणि कारच्या मागे लावू शकतात. चांगली गोष्ट म्हणजे एक टॅग एकापेक्षा जास्त वेळा वापरला जाऊ शकतो. QR Code ने पेमेंट करताय? जरा थांबा, 'या' चुका पडू शकतात महागात
NFC टॅगचा उपयोग काय आहे? :घराबाहेर पडताना दारावरील NFC टॅगला कमांड देऊन बल्ब, एसी टीव्ही सारखी उपकरणे चालू किंवा बंद करता येतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बल्ब आणि एसी चालू आणि बंद करायचा असेल तर तुम्ही NFC टॅगमध्ये अॅपच्या माध्यमातून सेटिंग करु शकता. मोबाईल चोरी झाला? कसं डिअॅक्टिव्हेट कराल UPI अकाउंट? फॉलो करा सिंपल स्टेप्स