

या देशात 100रुपये आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या भारतीय नोटा चालतात, पण अधिक मूल्यांच्या नोटा अधिकृतपणे स्वीकारल्या जात नाहीत.


नेपाळ राष्ट्र बँकेनं यासंबंधी भारतीय रिझर्व्ह बँकेला आवाहन केलं आहे. नेपाळच्या या राष्ट्रीय बँकेनं 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांना नेपाळमध्येही अधिकृत करण्यासाठी RBIला पत्र लिहिल आहे.


नोटबंदीच्या आधी नेपाळमधील नागरिक 25 हजारांपर्यंत मूल्य असलेल्या भारतीय चलनी नोटा आपल्याजवळ बाळगू शकत होते. तशी परवानगी रिझर्व्ह बँकनं दिली होती.


नोटबंदीनंतर भारतात 200, 500 आणि 2000च्या नवीन नोटा चलनात आल्या. त्या वापरण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं अद्याप दिली नाही. त्यामुळे फक्त 100 रुपयांच्या नोटा नेपाळमध्ये चलनात स्वीकारल्या जातात.


फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्टनुसार 100 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या नोटा नेपाळमध्येही स्वीकारल्या जाव्या आणि व्यवहारातील अडथळे दूर होण्यासाठी नेपाल राष्ट्र बँकेनं भारताच्या केंद्रीय बँकेला नोटांबाबत नोटिफिकेशन जारी करायला सांगितलं आहे.


नेपाळमधून भारतात कामासाठी स्थलांतर करणाऱ्या लोकांना नवीन नोटा चलनात नसल्यामुळे फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भारतीय चलनातील नवीन 200, 500 आणि 2000च्या नोटा नेपालमध्ये वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती नेपाल राष्ट्र बँकेतील फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे मुख्य भीष्म राजू धुंगाना यांनी RBIला केली आहे.