तुमच्याकडे गुंतवणुकीचे बरेच नवे पर्याय उपलब्ध आहेत. देशातल्या 5 मोठ्या कंपन्या नाॅन कनवर्टिबल डिबेंचर (NCD) घेऊन आल्यात. 2 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करू शकाल.
2/ 7
RBI नं रेपो दर कमी केलेत. म्हणजे बँकांचं व्याज कमी होणार. तसा एफडीमधून मिळणारं व्याजही कमी होणार. म्हणून या पर्यायांचा विचार करायला हवा.
3/ 7
L&T फायनान्स - कंपनीनं बाँड बाजारात आणलेत. त्यात 3, 4 किंवा 8 वर्षासाठी पैसे गुंतवू शकता. त्यातून मिळणारं व्याज 8.478 टक्के ते 9.05 आहे. कमीत कमी 10 हजार रुपये गुंतवावे लागतील.
4/ 7
मुथूट होम फायनान्स - या कंपनीला 300 कोटी जमा करायचेत. त्यासाठी बाँड मॅच्युरिटीसाठी 24,38,60 आणि 90 महिन्यांचा प्लॅन आहे. यात 9.25 टक्के ते 10 टक्के व्याज मिळणार. इथेही 10 हजार रुपये गुंतवावे लागतील.
5/ 7
मॅग्मा फिनकाॅर्प - या कंपनीसमोर NCDमधून 500 कोटी रुपये मिळवायचे. याच्या बाँडमध्ये 3, 5 आणि 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. 10.24 ते 10. 75 टक्के व्याज मिळेल. यातही 10 हजार रुपये गुंतवावे लागतील.
6/ 7
श्रेई इंफ्रास्ट्रक्चर- कंपनीपुढे 500 कोटी रुपयांचं लक्ष्य आहे. या बाँडमध्ये तुम्ही 400 दिवस, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. 9.75 ते 10.75 टक्के व्याजदर मिळेल. तुम्ही 9 मेपर्यंत गुंतवणूक करू शकता.
7/ 7
श्रीराम सिटी युनियन - या कंपनीचे बाँड तुम्ही 2, 3 आणि 5 वर्षांसाठी घेऊ शकता. यात तुम्हाला 9.26 टक्के ते 9.75 टक्के व्याज मिळू शकतं. या कंपनीत दर महिन्याला तुम्ही व्याज घेऊ शकाल अशी सोय आहे.