

म्युच्युअल फंडमध्ये गुंवणुक करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंड क्षेत्राने जवळपास ७७ लाख नवे अकाऊंट सुरू केले.


ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत एकूण गुंतवणुकदारांची संख्या वाढून आता ती जवळपास ८ कोटींपर्यंत पोहोचली आहे. हा आतापर्यंतच सर्वोत्तम आकडा आहे. याआधी २०१७- १८ मध्ये १.६ कोटी, २०१६- १७ मध्ये ६७ लाखांपेक्षा जास्त आणि २०१५- १६ मध्ये जवळपास ५९ लाख गुंतवणुकदारांनी म्युट्युअल फंडमध्ये गुंतवणुक केली होती.


७६.८४ लाख खाती वाढली- व्यक्तिगत गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंडची खाती दिली जातात. एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त खाती असू शकतात. म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना ‘एम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत ४१ सक्रिय म्युच्युअल फंड कंपन्यांकडे जवळपास ७ कोटी ९० लाख ३१ हजार ५९६ खाती आहेत.


मार्च, २०१८ च्या शेवटपर्यंत या खात्यांची संख्या ७ कोटी १३ लाख ४७ हजार ३०१ एवढी होती. म्हणजे सात महिन्यात ७६.८४ लाख खाती वाढली आहेत.


ELSS मध्ये ६६ लाख खाती वाढली- गेल्याक ही वर्षात छोट्या शहरांमधून आणि इक्विटी योजनांतर्गत म्युच्युअल फंड खात्यांचे प्रमाण वाढत आहे. इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड सेविंग्ज स्कीम्स (ELSS) मध्ये ६६ लाख खात्यांची संख्या होती. ही संख्या वाढून आता ६ कोटी झाली आहे. याशिवाय बॅलेन्स वर्गात खात्यांची संख्या ४.४ लाखांनी वाढून ६३ लाख झाली आहेत. तसेच इनकम फंडमधील खात्यांची संख्या ५.६ लाखांनी वाढून १.१३ कोटी झाली आहेत.