कोरोनामुळे (Coronavirus in India) देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर परिणाम झालाच आहे पण त्याचबरोबर सामान्यांचं बजेटही कोलमडलं आहे. लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांचे व्यवसाय कोलमडले आहेत. या परिस्थितीत अनेकजणं कर्ज घेण्याचा विचार करतात, अशावेळी तुम्ही LIC पॉलिसी (Personal Loan Against LIC Policy) काढलेली असेल तर ती तुमच्या फायद्याची ठरेल.
हे कर्ज प्रवास, उच्च शिक्षण, वैद्यकीय इमरजन्सी, लग्न, घर दुरुस्ती इत्यादी खर्चासाठी घेतले जाऊ शकते. हे विमा पॉलिसीवर घेण्यात आलेलं सुरक्षित कर्ज असतं ज्याठिकाणी तुमची विमा पॉलिसी सुरक्षितता म्हणून ठेवली जाते. अर्जदार कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यास एलआयसी विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटी किंवा क्लेम रकमेवर परतफेड करता येते.
सुरक्षितता म्हणून पॉलिसी डॉक्यूमेंट- एलआयसीच्या ई-सेवांद्वारे आपण किती कर्ज घेण्यास पात्र आहात हे शोधू शकता. हे कर्ज एक सुरक्षित कर्ज आहे कारण याकरता आपण पॉलिसीची कागदपत्र सुरक्षितता म्हणून देतो. जर कर्जदार कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी ठरला तर एलआयसी त्याच्या मॅच्युरिटीमधून किंवा क्लेम रकमेमधून पैसे वजा करते.
पर्सनल लोनपेक्षा चांगलं का?-कर्जाचा कमीत कमी कालावधी 6 महिन्याचा असतो, मात्र याचा मॅच्युरिटी पीरिएड संपेपर्यंत देखील तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता. एलआयसी अशी देखील सुविधा देतं की, तुम्ही केवळ व्याजाची रक्कम चुकती करायची आणि मुळ मुद्दल मॅच्युरिटीच्या रकमेतून वजा केलं जाईल. हे कर्ज एंडोमेंट प्लॅन, इन्कम प्लॅन आणि यूनिट लिंक्ड प्लॅनवरच मिळतं ज्यांची सरेंडर व्हॅल्यू असते. हे कर्ज टर्म प्लॅनवर नाही मिळत. उदा. हे कर्ज एलआयसी न्यू जीवन आनंद, जीवन रक्षक, जीवन लक्ष्य, जीवन प्रगती, जीवन लाभ इ. योजनांवर मिळतं.
कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक?- LIC कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ओळखपत्रासाठी आधार कार्ड, वोटर आईडी कार्ड, पासपोर्ट इ., रेसिडेन्शिअल प्रुफसाठी आधार कार्ड, वोटर आईडी कार्ड, पासपोर्ट, यूटिलिटी बिल इ. उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी सॅलरी स्लीप, बँक स्टेटमेंट दाखवावे लागेल. ज्या खात्यात तुम्हाला कर्ज हवे आहे त्याचा एक कॅन्सल्ड चेक देखील द्यावा लागेल. याशिवाय कर्ज घेतल्यानंतर पॉलिसीची कागदपत्र एलआयसीकडे सोपवावी लागतील.
कर्ज घेण्यासाठी मुख्य अटी-1) LIC पॉलिसीच्या बदल्यात कर्ज घेण्यासाठी काही अटी आहेत. अर्जदाराचे कमीतकमी वय 18 वर्षे असणं आवश्यक आहे. 2)अर्जदाराकडे वैध एलआयसी पॉलिसी असणं आवश्यक आहे. 3) कर्जासाठी वापरल्या जाणार्या एलआयसी पॉलिसीमध्ये सरेंडर व्हॅल्यूची हमी असणं आवश्यक आहे म्हणजेच मुदत पॉलिसीवर ही सुविधा उपलब्ध नाही. 4) कमीत कमी 3 वर्षापर्यंत एलआयसी प्रीमियमचे पूर्ण पेमेंट झालेलं असावं
कशाप्रकारे कराल अर्ज?- तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने एलआयसी पॉलिसीवरील कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्ही एलआयसी कार्यालयामध्ये जाऊन आणि योग्य केवायसी कागदपत्र जमा करून या कर्जासाठी अर्ज करू शकता. शिवाय तुम्ही एलआयसीच्या ई-सेवांसाठी रजिस्टर केलं असेल तर तुम्ही ऑनलाइन अकाउंटमध्ये लॉगइन करू शकता आणि याच पोर्टलवरून कर्जासाठी अर्ज करू शकता. अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला केवायसी कागदपत्र अपलोड करण्याची किंवा ते एलआयसी ऑफिसमध्ये पाठवण्याची आवश्यकता भासू शकते.