

मुलीच्या लग्नाची, तिच्या भविष्याची चिंता प्रत्येक आई- बापाला भेडसावत असते. तिच्या जन्मापासूनच लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद केली जाते. म्हणूनच LIC ने मुलींच्या लग्नासाठी खास पॉलिसी तयार केली आहे.


LIC ने पॉलिसीचे नावही ‘कन्यादान योजना’ असं ठेवलं आहे. या योजनेत दररोज 121 रुपये याप्रमाणे महिन्याला 3600 रुपयांच्या प्रीमियमवर ही पॉलिसी मिळते. यापेक्षा कमी किंवा जास्त प्रीमियम भरुनदेखील ही पॉलिसी घेता येते.


कन्यादान पॉलिसीत दररोज 121 रुपयांप्रमाणे पैसे भरल्यास 25 वर्षांनी 27 लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी घेतल्यानंतर जर मृत्यू झाला तर कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही आणि दरवर्षी एक लाख रुपयेही दिले जातात. तसेच 25 वर्ष पूर्ण झाल्यावर वारसांना 27 लाख रुपये मिळतात.


LIC ची ही पॉलिसी घेणाऱ्यांचं कमीत कमी 30 वर्ष वय आणि मुलीचे वय 1 वर्ष इतकं असले पाहिजे. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी असली तरी प्रीमियम फक्त 22 वर्ष भरावा लागेल. पॉलिसी घेणाऱ्याच्या आणि मुलीच्या वयानुसारदेखील पॉलिसी मिळते. मुलीच्या वयानुसार पॉलिसीची मुदत कमी केली जाऊ शकते.


अशी आहे पॉलिसी- 25 वर्षांची मुदत 22 वर्ष प्रीमियम भरावा लागेल दररोज 121 रुपये किंवा महिन्याला 3600 रुपयांपर्यंत प्रीमियम पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम द्यावा लागत नाही विमाधारकाच्या मृत्यूनंतर मुलीला दरवर्षी एक लाख रुपयेही दिले जातात 25 वर्ष पूर्ण झाल्यावर वारसांना 27 लाख रुपये मिळतात पॉलिसी घेणाऱ्याच्या आणि मुलीच्या वयानुसारदेखील पॉलिसी मिळते


LIC च्या आणखी काही पॉलिसी- सिंगल इनडाउमेंट प्लॅन LICच्या या पॉलिसीत फक्त एकदाच प्रिमीयम भरावा लागतो. ही पॉलिसी 90 दिवसांच्या मुलांपासून 65 वर्ष वयाच्या व्यक्तीला घेता येते. हा प्लॅन 10 वर्षांच्या मुदतीचा असून यात कमीत कमी 50 हजार रुपयांची विमा पॉलिसी घेता येते.