

मंडळी, श्रीमंत होण्यासाठी सगळेच जण धडपड करत असतात. त्यात अगदी तुम्ही-आम्हीदेखील आहोत. कधी आपल्या प्रयत्नांना भरघोस यश येतं तर कधी आपण नशिबाला दोष देत बसतो. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही खास गोष्टी सागंणार आहोत त्याने तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही.


जर तुमचं वय 25 असेल तर आताचा गुंतवणुकीसाठी तयार व्हा. आतापासूनच 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला तब्बल 2 कोटी रुपये मिळतील. या रकमेवर 10 टक्के दराने रिटर्न मिळाला तरी निवृत्तीपर्यंत कोट्यधीश व्हाल.


यासाठी सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआईपी) च्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागेल. एसआयपीद्वारे पैसे म्युचुअल फंडात गुंतवले जातात. यामध्ये कमीत कमी 10 टक्के रिटर्न मिळत असल्याचं तज्ज्ञांच मत आहे.


वय 25 वर्ष, महिन्याला ५ हजार रुपयांची गुंतवणूक, १० टक्के व्याजदर, निवृत्तीचं वय ६० वर्ष, गुंतवणूक रक्कम – २१ लाख, व्याजासह रक्कम – 1.70 कोटी (अंदाजे), मिळणारी रक्कम – 1.91 कोटी (अंदाजे)


जर तुमचं वय 30 असेल तर तुम्ही 8 हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता. यामध्येही तुम्हाला निवृत्तीनंतर तब्बल 2 कोटी रुपये मिळतील.


वय 30 वर्ष, महिन्याला 8 हजार रुपयांची गुंतवणूक, 10 टक्के व्याजदर, निवृत्तीचं वय 60 वर्ष, गुंतवणूक रक्कम – 28.80 लाख, व्याजासह रक्कम – 1.53 कोटी (अंदाजे), मिळणारी रक्कम – 1.82 कोटी (अंदाजे)


एसआयपीच्या माध्यमातून लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्यातून तुम्हाला जास्त रिटर्न मिळतो. कारण, यावर चक्रवाढ पद्धतीनं व्याज मिळतं. त्यामुळे लवकर गुंतवणूक केली तरच ते फायद्याचं आहे.