SBI ने काय म्हटलं?- बँकेच्या मते, फसवणूक करणारे आपले वैयक्तिक तपशील गोळा करण्यासाठी बँक/कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात आणि ग्राहकांना एक संदेश पाठविला जातो. ग्राहकांनी या संदेशास बळी पडू नये आणि केवायसीसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. तसेच, जर एखाद्या ग्राहकाच्या बाबतीत असं काही घडलं तर त्याबद्दल त्वरित सायबर क्राइमला कळवा.
घरबसल्या करा केवायसी अपडेट- कोरोना साथीच्या काळात एसबीआयने खातेदारांना केवायसीची कागदपत्रे ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना रहिवासी दाखल्याचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र नोंदणीकृत ईमेल अथवा पोस्टद्वारे पाठवावे लागेल. तुम्हाला कागदपत्रं त्याच मेल आयडीवरून पाठवावी लागतील जो मेल आयडी तुम्ही बँक तपशीलात दिला आहे. कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत त्या ईमेलवरून बँक शाखेच्या ईमेल पत्त्यावर पाठवावी लागेल.