आशीष परमार, जूनागढ प्रतिनिधी : यंदा आंब्यासाठी जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे. आंबा कुणाला आवडत नाही प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं पण आता याच मधुर आंब्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
2/ 7
केसर आंब्याच्या पहिल्या पेट्या बाजारात आल्या आहेत. त्याला सोन्याचा भाव आला आहे. केसर हा आंबाच मुळात एवढा जबरदस्त असतो. नुसत्या वासानेच खाण्याची इच्छा होते.
3/ 7
जवळपास 40 पेट्या दाखल झाल्या आहेत. काल २० आणि आज २० केशर आंब्याच्या पेट्या गुजरातमधील सर्वात मोठ्या बाजारपेठेत पोहोचल्या आहेत.
4/ 7
अजूनही केशर आंब्याची आवक सुरू झाली असून त्याला चांगला भाव मिळत आहे. लिलावात दोन ते तीन हजार रुपयांना विक्री झाली.
5/ 7
गीरच्या केशर आंब्याला नेहमीच गोड असतो आणि त्याला मोठी मागणीही असते.
6/ 7
हा आंबा देश विदेशात प्रसिद्ध आहे. तर जुनागढ मंडईत गेल्या दोन दिवसांपासून आंब्याची आवक होत आहे.
7/ 7
होळीनंतर येत्या काही दिवसांत केसर आंब्याची आवक वाढणार असून आंबाप्रेमींना आंब्याची चव चाखण्याची संधी मिळणार आहे.