कारवाईनंतर पथकाकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं की, कर्नाटक लोकायुक्तांच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने भाजप आमदार वीरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदल याला ४० लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. त्याच्या कार्यालयातून १.७ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कमही जप्त केली आहे.