IRCTC च्या नवीन टूर पॅकेजसह पर्यटक उत्तराखंडला भेट देऊ शकतात. या टूर पॅकेजद्वारे प्रवासी स्वस्तात हरिद्वार, मसुरी, ऋषिकेश आणि डेहराडूनला भेट देऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला उत्तराखंडचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल, तर IRCTC चे हे टूर पॅकेज तुमच्यासाठीच आहे. उन्हाळ्यासाठी IRCTC चं खास टूर पॅकेज, स्वस्तात फिरुन या हिल स्टेशन!
हे टूर पॅकेज 6 दिवसांचे आहे : IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव Heavenly Uttarakhand आहे. हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवासी फ्लाइट मोडने प्रवास करतील. टूर पॅकेजमध्ये हरिद्वार, मसुरी, ऋषिकेश आणि डेहराडून या ठिकाणांचा समावेश असेल. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी राहण्याची आणि भोजनाची सुविधा मोफत असेल. प्रवाशांना उत्तराखंडमध्ये प्रवास करण्यासाठी IRCTC कडून बस सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यासोबतच प्रवाशांना प्रवास विमाही दिला जाणार आहे.