इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) आझादी का अमृत महोत्सव आणि 'देखो अपना देश' अंतर्गत चार धाम यात्रा आयोजित करतेय. या पॅकेजद्वारे तुम्हाला हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, बरकोट, जानकी चट्टी, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी आणि सोनप्रयागला भेट देता येणार आहे.
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटेच प्रवास करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 69,111 रुपये खर्च करावे लागतील. तर 2 लोकांसह, प्रति व्यक्ती भाडे 52,111 रुपये आहे. याशिवाय 3 लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 51,111 रुपये मोजावे लागतील. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी, बेडसह 45,111 रुपये आणि बेडशिवाय 37,511 रुपये आकारले जातात. बेडशिवाय 2 ते 11 वर्षांच्या मुलासाठी 13,511 रुपये द्यावे लागतील.
पॅकेजचे नाव CHARDHAM YATRA STANDARD PACKAGE EX-MUMBAI असे आहे. यामध्ये तुम्ही हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, बरकोट, जानकी चट्टी, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी आणि सोनप्रयाग येथे फिरुन येऊ शकता. मे 14/मे 21/मे 28/जून 4/जून 11/जून 18/जून 25 या तारखांना पॅकेज अव्हेलेबल आहे. तसेच टूरचा कालावधील 12 दिवस आणि 11 रात्रींचा आहे. यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर मिळेल. तसेच फ्लाइंटने प्रवास करण्याची संधी मिळेल.