IRCTC ने चंदीगड, शिमला आणि कुफरीसाठी बजेट टूर पॅकेजेस सादर केले आहेत. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता आणि उन्हाळ्यात येथे फिरू शकता. महत्त्वाचे म्हणजे, IRCTC पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते.
या टूर पॅकेजेसद्वारे प्रवासी देशभरातील विविध ठिकाणांना सोयीनुसार आणि स्वस्तात भेट देतात. आता IRCTC ने उन्हाळ्यासाठी चंदीगड, शिमला आणि कुफरी टूर पॅकेज सादर केले आहेत. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घेऊया.IRCTC चं स्वस्त तिकीट खरेदी करायचंय? फॉलो करा 'ही' ट्रिक, मिळेल 5% सूट!
हे टूर पॅकेज कधी सुरू होत आहे? : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने पाच रात्र आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आणलेय. हे टूर पॅकेज एप्रिलपासून दर शुक्रवारी सुरू होईल. टूर पॅकेज 15 एप्रिलपासून दर शुक्रवारी सुरू होईल आणि 14 जुलै रोजी संपेल. हे टूर पॅकेज लखनऊपासून सुरू होईल आणि लखनऊमध्येच संपेल. Aadhaar Card हरवलंय? चुकीचा वापर होऊ नये म्हणून असं करा लॉक
या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवाशांना चंदीगड, शिमला आणि कुफरी या पर्यटनस्थळी नेण्यात येणार आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना चंदीगडमधील रोझ गार्डन, रॉक गार्डन, सुखना तलाव आणि मनसा देवी मंदिराला भेट देण्यासाठी नेले जाईल. शिमल्यात पिंजोर गार्डन आणि मॉल रोडचा फेरफटका मारता येईल. टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना कुफरीमधील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिलेल. या टूर पॅकेजचा प्रवास ट्रेनमधून होणार आहे. यामध्ये प्रवाशांना सिंगल ऑक्युपन्सीसाठी39,225 रुपये मोजावे लागतील. डबल आणि ट्रिपल ऑक्युपेंसीसाठी अनुक्रमे 22,170 रुपये आणि 17,620 रुपये खर्च लागेल.