गुंतवणूक भविष्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची आहे. छोटी गुंतवणूक भविष्यातील गरज पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच नियमितपणे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर तो लवकरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. 20-21 वर्षांच्या तरुणांनी काही गोष्टींचे पालन केले तर ते 30 वर्षांपर्यंत आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत पोहचून आपली स्वप्नही पूर्ण करु शकतील.
कमर्शियल रिअल इस्टेट- देविका ग्रुपचे एमडी अंकित अग्रवाल म्हणतात की, 20-29 वयोगटातील लोकांसाठी व्यावसायिक रिअल इस्टेट ही चांगली गुंतवणूक असू शकते ज्यांना वयाच्या 30 नंतर हमखास रिटर्न हवे आहेत. ऑफिस, रिटेल आणि वेअरहाऊस इत्यादी व्यावसायिक रिअल इस्टेट हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अंकित अग्रवाल यांच्या मते, ग्रेड-ए ऑफिस स्पेस सरासरी 6-7 टक्के आणि रिटेल युनिट्स 8-9 टक्के परतावा देऊ शकतात.