पाळीव प्राण्यांना ट्रेनमधून घेऊन जाण्यासंदर्भात भारतीय रेल्वेनं काही नियमात बदल केला आहे. ट्रेनमध्ये प्राण्यांना घेऊन प्रवास केल्याच्या अनेक तक्रारी सध्या रेल्वेकडे येत असल्याने त्यांच्यासंदर्भातील नियम अधिक कठोर केले आहेत.
2/ 6
नव्या नियमानुसार प्राण्यांना केवळ फर्स्ट क्लासमधूनच प्रवास करता येणार आहे. लोकल ट्रेननं प्रवास करण्यासाठी अजूनही बंदी आहे. जर असे आढळल्यास किंवा नियमांचं उल्लंघन केल्यास मोठी कारवाई होऊ शकते.
3/ 6
फर्स्ट क्लासमध्ये चार बर्थ बुक करणं आवश्यक असणार आहे. दुसऱ्या क्लासमधून ट्रॅव्हल करणं महागात पडू शकतं. रेल्वे सुटण्याआधी त्याला तीन तास आधी कार्यालयात आणावं लागेल.
4/ 6
श्वानाची जात, लिंग, लसीकरण दिलेल्याचं प्रमाणपत्र, रंगाचा उल्लेख फॉर्मवर करणं आवश्यक आहे. यासोबत कुत्र्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रवाशांनाच करावी लागेल. फक्त आरक्षित डब्यातूनच श्वानाला घेऊन प्रवास करता येणार आहे.
5/ 6
प्राण्यांसाठी तिकीट वेगळं असेल त्यासाठी आवश्यक त्या अटींची पूर्तता करून त्याचं वेगळं तिकीट सोबत ठेवणं आवश्यक आहे. श्वानाची जबाबदारी ही संपूर्णपणे प्रवाशाची असेल. त्याला रेल्वे जबाबदार असणार नाही.
6/ 6
रेल्वेने जनावरांची कायदेशीर डिलिव्हरी केल्यानंतर, मालवाहू व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव स्टेशनवर पोहोचण्यास उशीर होतो, परंतु रेल्वे त्याची वाट पाहत नाही. तथापि, पाळीव प्राण्यांच्या बाबतीत रेल्वेचे कायदे काहीसे सोपे आहेत.