भारतात जास्तीत जास्त लोक ट्रेनचा वापर करतात. भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे देशभरात आहे. कमी अंतर असो किंवा दूरचं भारतीय रेल्वे नेहमीच पहिली पसंत असते. कारण यात कमी पैशात आरामात प्रवास करण्याची व्यवस्था असते. पण ही ट्रेन तयार करायला किती खर्च येतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
ज्यावेळी एखादी नवीन कार किंवा बाईक बाजारात लॉन्च केली जाते तेव्हा त्याच्या वैशिष्ट्यांसोबतच लोक त्याच्या किंमतींमध्येही इंट्रेस्ट दाखवतात. मग एवढ्या मोठ्या ट्रेनची किंमत किती असेल? जी एवढ्या लोकांना रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते? आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. ट्रेनचा प्रत्येक डबा आणि त्याच्या सोयीनुसार त्याची किंमत ठरलेली असते. अशा परिस्थितीत जनरल बोगी, स्लीपर आणि एसी कोचचे दर वेगळे आहेत.
सर्व गाड्यांचा खर्च त्याच्या डब्यात उपलब्ध असलेल्या सुविधांवर अवलंबून असतो. जर ट्रेन सामान्य असेल तर तिची किंमत कमी असेल. कारण त्यात सुविधा कमी आहेत. पण हो, जर आपण स्लीपरबद्दल बोललो तर त्याचा कोच बनवण्यासाठी जास्त पैसे लागतील. आता एसी कोचविषयी बोलू. एअर कंडिशनर बसवण्यापासून काच बसवण्यापर्यंत आणि सर्व सुविधा जोडण्यापर्यंत त्याची किंमत अनेक पटींनी वाढते.