भारतीय रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी लाखो लोक प्रवास करत असतात. भारतीय रेल्वेनं प्रवाशांना एक गोड बातमी दिली आहे. त्यांच्या प्रवासाचा खर्च आता कमी होणार आहे. तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हा नियम लागू होणार का समजून घ्या.
2/ 6
भारतीय रेल्वेनं AC ३ टायर इकोनॉमी क्लासच्या तिकीटाचे दर कमी केले आहेत. 60 ते 70 रुपये हे दर कमी झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
3/ 6
2021 मध्ये भारतीय रेल्वेनं AC ३ इकोनॉमी कोचची सुरुवात केली होती. प्रवाशांना कमी किंमतीमध्ये AC कोचने प्रवास करता यावा यासाठी खास सुविधा सुरु करण्यात आली होती.
4/ 6
सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. ट्रेनचं तिकीट कमी झाल्याने प्रवाशांची संख्या वाढेल. याशिवाय चादर, बेडशिट तेवढ्याच तिकीटात प्रवाशांना मिळणार आहे.
5/ 6
ज्यांनी आधीच बुकिंग केलं आहे आणि आता जर पैसे कमी झाले आहेत तर अशा प्रवाशांचं नुकसान होणार नाही. उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर रिफंड करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
6/ 6
ज्यांनी तिकीट ऑफलाईन काढलं आहे त्यांना रिफंडचे पैसे परत घेण्यासाठी तिकीट काउंटरवर जावं लागणार असल्याची माहिती देखील रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.