उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. तुम्ही रेल्वेची तिकिटं बुक करणार असाल, तर काही बदललेले नियम जाणून घ्या.
2/ 6
रेल्वेनं यावेळी महिलांसाठी जास्त सीट्स ठेवल्यात. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी खालच्या 4 सिट्स आरक्षित असतील. या अगोदर त्यांची संख्या 3 होती.
3/ 6
मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलांसाठी 6 स्लिपर बर्थ आरक्षित असतील. गरीब रथ एक्सप्रेससारख्या ट्रेन्समध्ये 3AC वर्गात 6 बर्थसीट आरक्षित असतील.
4/ 6
राजधानी, दुरांतो आणि वातानुकूलित ट्रेन्समध्ये महिलांसाठी 6 बर्थचा कोटा वाढवलाय. ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षावरील महिला, गरोदर महिला, एकटा प्रवास करणारी महिला यांना यांचा फायदा होईल.
5/ 6
सर्व ट्रेनमधल्या स्लीपर बर्थपैकी 6 खालच्या सीट्स आणि 3AC मधल्या 3 खालच्या सीट्स ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आरक्षित असतील.
6/ 6
राजधानी आणि दुरांतोसारख्या ट्रेन्समध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 सीट्स आरक्षित असतील. याआधी 3 सीट्स आरक्षित असायच्या.