टॅक्सपेयर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी मोबाईल अॅप लॉन्च केलेय. एआयएस फॉर टॅक्सपेयर्स नावाचे हे अॅप युजर्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. या अॅपच्या मदतीने करदात्यांनी आर्थिक वर्षात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे डिटेल्स सहज कळू शकतात. अॅपच्या मदतीने, टॅक्सपेयर्स अॅनुएल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर इन्फॉर्मेशन पाहून विभागाने काही चुकीची माहिती जोडली आहे की नाही हे तपासू शकतात.ITR भरणाऱ्यांनो चुकूनही विसरु नका 'ही' तारीख! अन्यथा भोगावे लागेल नुकसान
मोबाइल अॅपवर अॅनुअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) उपलब्ध झाल्याने करदात्याला खूप फायदा होईल. हे अॅप लॉन्च करताना, आयकर विभागाने म्हटले आहे की, 'टॅक्सपेयर्सला या अॅपवरून स्रोतावरील कर कपात/ स्रोतावरील टॅक्स कलेक्शन (TDS/TCS), व्याज, लाभांश आणि शेअर सौद्यांची सर्वसमावेशक माहिती मिळेल. यासोबतच त्यांना त्यावर मत मांडण्याचा पर्यायही मिळणार आहे.
अॅप कसे वापरावे? :AIS for Taxpayer अॅक्सेस करण्यासाठी, टॅक्सपेयर्सला अॅपवर रजिस्टर करावे लागेल. रजिस्ट्रेशन पॅन नंबर वापरावा लागेल. ई-फायलिंग पोर्टलवर रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर येणार्या ओटीपीद्वारे करदात्यांना त्यांची ओळख सत्यापित करावी लागेल. टॅक्सपेयर्स अॅपसाठी 4 अंकी पिन नंबर देखील सेट करू शकतात.रोजच्या 333 रुपयांच्या बचतीने व्हाल लखपती, Post Office ची ही स्किम देते जबरदस्त रिटर्न