

इनकम टॅक्स डिपार्टमेंट(Income Tax Department)पारदर्शक कर अभ्यासाविषयी नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. आता पुन्हा एकदा IT डिपार्टमेंटने एक नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्यातून त्यांनी भारतीय नागरिकांना पैशांच्या वापरासंबंधीत काही सुचना दिल्या आहेत. यात त्यांनी टॅक्स देणाऱ्या व्यक्तींनी काय करावे आणि काय करु नये याविषयीची सर्व माहिती दिली आहे. याचा मुख्य उद्देश ब्लॅकमनीवर नियंत्रण ठेवणे हा असून ITडिपार्टमेंटचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही आयकर विभागाने दिला आहे.


आयकर विभागाने 'क्लिन ट्रांझॅक्शन, क्लिनर इकॉनॉमी' या नावाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार नागरिकांना पैशांच्या देवााण-घेवाणीबाबत 4 प्रमुख गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.


1. कोणत्याही व्यक्तीने एकाच दिवशी किंवा कोणत्याही कारणासाठी 2 लाख रुपयांपर्यंत किंवा त्याहून जास्त पैसे स्विकारु नयेत. 2. निश्चित मालमत्ता हस्तांतरणासाठी रोकड स्वरुपात वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचा भरणा करु नये. 3. व्यवसायासंबंधीत खर्चाचा रोकड स्वरुपात दहा हजार रुपयांहून अधिक किंमतीचा भरणा करु नये. 4. रजिस्टर्ड ट्रस्ट किंवा राजकीय पक्षाला दोन हजार रुपयांपेक्षा अधिक पैशांचे दान करु नये.