

पीएफ आणि पेंशन असणाऱ्यांचे हजारो कोटी रुपये बुडण्याचा धोका सध्या आहे. IL&FS संकटामुळे प्रॉविडंट आणि पेंशन फंड्सना याचं नुकसान उचलावं लागू शकतं.


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, IL&FS आणि याच्या इतर ग्रुप कंपन्यांमध्ये प्रॉविडंट आणि पेंशन फंडचे जवळपास १५ ते २० हजार कोटी रुपये लागले आहेत. जर हे पैसे बुडाले तर पेंशन फंडच्या रिटर्नमध्ये घट होऊ शकते.


सध्या IL&FS कंपनी सध्या मोठ्या वित्तीय संकटात अडकली आहे. कंपनीवर सध्या ९१ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. यातील ६१ टक्के बँकेचं कर्ज आणि ३३ टक्के डिबेंचर आणि कमर्शियल पेपरांमधून घेतलेली कर्ज आहेत.


रेटिंगमध्ये अडकला पैसा प्रॉविडंट आणि पेंशन फंड्सने IL&FS कंपनीचे बॉण्ड विकत घेतले. IL&FS च्या ट्रीपल ए रेटिंगमुळे जास्त बॉण्ड विकत घेतले गेले.


ट्रीपल ए रेटिंग असलेल्या कंपनीत गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. तसंच या कंपनीतून चांगले रिटर्न्सही मिळण्याची शक्यता असते. पण, IL&FS बुडतीला आल्यामुळे प्रॉविडंट आणि पेंशन फंड्सचे पैसेही यात अडकले आहेत.